Posts

महागाई उपासमारी बेरोजगारी ह्यांचे भोंगे वाजतायेत....

महागाई उपासमारी बेरोजगारी ह्यांचे भोंगे वाजतायेत....  जग हे दिल्या घेतल्याचं आणि जगातील मंडळी हि ऋणी आहेत सर्वांपरी. हे शाश्वत जरी खरं असलं तरी सर्वसमावेशक गोष्टीचा ह्याला काही फायदा होताना आपल्याला दिसत नाही.दिवसेंदिवस महागाई आरपार चाली असून सामान्य परिश्रम करणाऱ्या लोकांना ह्याचा उणीव फार बसत आहे. शेतकरी वर्गापासून ते नोकरदार वर्गाला प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तडजोड हि करावी लागत आहे,आणि ही तडजोड मोठ्याप्रमाणात करायला लागल्यामुळे पूवीपेक्षा आता पैसा खर्च करताना १० वेळा माणूस विचार करीत आहे. देशात घगूती गॅस सिलेंडरचे भाव ५० रुपयांनी वाढले आहेत.यामुळे आता ९९९.५० रुपयांवर सिलेंडर दर पोहचले आहेत. आजच्या पिढीला तरुण भारतीय आशावादी आणि आतमविश्वासाने परिपूर्ण आहेत.आपले आयुष्य कसे असावे,आपल्या आयुष्यात काय मिळवायचे आहे हे त्यांना आधीपासूनच माहित आहे,परंतु करोन काळापासून अनेक लोंकाच्या नोकऱ्या गेल्या असून कुटूंबाच्या गरजा आणि मागण्यादेखील वाढल्या आहेत त्यामुळे जबाबदाऱ्यांची पूर्तता करणे आणि त्यांना गरजेचा असलेला आरामदायीपणा पुरवणे महत्वाचे असते.तसेच आपले वाढते उत्पन्न आणि वाढती...

*कबुतरांच अंड...*

Image
माझ्या जवळच्या सर्वांना(मित्र-मैत्रिणी) ह्या विषयांचा नाव ऐकून नवल वाटेल पण वाचून तुम्हाला नक्की आनंद होईल हे खरंय...      जगाच्या पाठीवर असंख्य गोष्टी ह्या सतत क्षणीक-क्षणीक सेकेंदला घडत असतात.निसर्गाच्या प्रत्येक क्षणीक सुखांचा आनंद #मनुष्ययोनीला #उपभोक्ता येत नाही परंतु,माझी अशी #प्रांजळ विनंती आहे कि,सर्वांना जर तुम्हाला पूर्ण दिवसांतला थोडासा #वेळ जर मिळाला तर नक्की ह्या निसर्गासाठी काढा म्हणजेच; निसर्गाच्या सानिध्यात मुद्दाम डोकं घाला आणि 'सजीव जीव' किती प्रामाणिक आहे हे आपल्याला रोजच्या जीवनात समजेल.       आज सकाळी मी सुमारेस ११.३० च्या दरम्यान 'आकाशवाणीला' ला आले आणि (फ्रेश) होण्यासाठी प्रसाधनगृहात(washroom)गेले.तिथे छोटस,नाजूकस #कबुतरांच अंड(प्रेमाने#अंडु म्हणतेय)खाली पडलेले पाहिलं,आणि हे बघताच माझ्या #मनाचं एकदमच पाणी झालं आणि मला अजूनही हाच प्रश्न पडलाय की मी येण्याआधी कितीतरी #महिला येवून गेल्या असतील पण कोणाची #इच्छा नाही का बरं झाली ? की नवीन #प्राणीजणांवरांचा जन्म झालाय आणि ते #गर्भाशयताल बाळ अस #अस्थावयस्थ होउनी पडलंय त्याला बाहेर यायचं आहे,...

अबब्ब google झाले आज २३वर्षाचे....

Image
    जगात भारी असं म्हंटलं कि अनेक गोष्टी समोर येतात.पण हि अशी गोष्ट आहे जी कमी वेळात अनेक ठिकाणी थेट पोहोचते आणि क्षणार्धारत तिचा उपयोग प्रत्येक मनुष्याला होतो आणि कायमस्वरूपी होत राहणार आहे.ती आहे google प्रख्यात कंपनी. हा google प्रत्येकाला हवा-हवासा आणि मोठ्यातील मोठी गोष्ट सहज उपलब्ध करून देणारा हा माझा जवळचा सखा म्हणजेच मित्र आहे.नवीन गोष्टी मला नेहमी आतुरतेने सांगणारा माझा (भावविश्वातला) (दोस्त) मला सगळं खरं-खुरं सांगून जातो ते हि अगदी माहितीपर मोठ्यासंख्येने आणि मी त्यात एवढी गुंग होते कि माझेच भान मला राहत नाही.नको त्या ( पानचट )गोष्टी पण google अगदी मजेशीर सांगतो.आणि शब्दांची खेळी तर google  इतक्या पटकन सांगतो कि (search) केलेले काही शब्द मी काही सेकेंदात अशी विसरते कि मी त्यात रमत बसली कि मला google चं पुन्हा मूळ विषयांवर आणून सोडतो.माझ्या सारखं सगळ्यांच होत असेल का ? आणि होत असेल तर तुम्ही काय बरं त्यावर search  करतात आणि नाही करत असाल तर करायला सुरुवात करा,कारण त्याला बरं वाटेल आणि तुमच्या डोक्याला चालना मिळेल आणि गमतीशीर किस्सा google   तुम्हा...

स्पर्शाचा सहवास...🥀

Image
स्पर्शाचा सहवास...🥀  *"स्पर्श होता तुझा...,विसरलो भान मी"* ...बरं,.. हे झालं प्रेमाला उपमा देणार गाण पण मी मागील काही दिवस आधी # *इंस्टाग्राम* वर ' *चला हवा येऊ द्या' या @ऑफिशियल पेज* वर एक #पोस्ट पाहिली आणि मला वेदना असाह्य झाल्या त्या पोस्टच नाव *#स्पर्शाचा सहवास* असा होता. माझ्या मनात झटकन एक प्रश्न आला ? तो म्हणजे नक्की कोणता हा स्पर्श बर...,असेल..? की तो प्रत्येक मनुष्य जीवाला कायम आधार देणारा असेल आणि तो स्पर्श म्हणजे *#हाताची उब* ती दुसऱ्या हाताला मिळणारी स्पर्शाची *#जाणीव* तसाच त्याचा सहवास हा कधी सामान्य नसतो आणि प्रत्येक वेळी सारखा नसतो तर त्याची प्रत्येकासाठीची चाहूल कुठेतरी नाविन्य आणि एक *#सुखद सहवास* देणारी उबदार अशी गोष्ट असते. मित्रांनो, मला रुग्णांच्या हाताला कसा स्पर्श होतो आणि त्याची किंमत आजच्या तारखेला किती आहे?आणि हा स्पर्श किती *#लाख मोलाचा* असतो आणि कितीतरी रुग्णांना #स्थिरावत असेल ही मुख्य बाब सतावत आहे. रुग्ण बेडवर असतो तेव्हा त्याला जवळ कुणीतरी असावे असे वाटत असते मात्र *#कोरोनाच्या* या आजारात *#मानवी स्पर्श* शक्य नसताना *#covid word* मध्ये...

@Ambulanceचा #सायरन वाजतोय...🔊

Image
   मुबंई मायानगरी कधी न थांबलेली, कधीही शांत नसलेली आणि कधीही बंद न पडणारी,सुंदर स्वप्न दाखवणारी, सतत चंगळवादात नेहमी बुडालेली ह्या मुबंई मायनगरीला लागण झाली ती एका भयंकर ( कोरोना )रोगांची.भयंकर विकृती दर्शवणारा तसेच भयावह  परिस्थितीत आपल्याला भय दाखवून अशांतता पसरवणारा हा रोग पूर्ण  देशभरात 2020 च्या फेब्रुवारी महिन्यापासून जो संसर्ग सुरू झाला तो अद्याप बंद तर झाला नाही पण,मनुष्ययोनीला हेलावून टाकणारी अनेक दृश्य,तसेच मोठ्याप्रमाणे वाढणारी रुग्ण संख्या रोजच्या रोज पाहायला मिळाली.   ' नोवल कोरोना व्हायरस'(covid 19) हा अचंबित असा रोग देशभरात पसरला आणि..... काय झाले?अतिशय दाहक वातावरण त्यात शहरांतील जगजीवन खेळण्यातल्या पत्यांच्या बंगल्या सारखे कोलमडून ह्या रोगात सामील झाले.   जस-जसे हा विषारी वायू ह्या मानवी शरीरात मिसळल्याला सुरवात झाली तस-तशी दिवसेगणित संख्या वाढू लागली. ह्या सगळ्या हेलावून टाकणाऱ्या विस्कळीत आयुष्याला कलाम बसला.जगभरातील सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या,अत्या-व्यस्त व्यवहारात,रोजच्या दिनचर्येला आता कुठेतरी शिक्का बसला आणि ह्या परिस्थितीत मदतीचे दोन...