Posts

Showing posts from September, 2021

अबब्ब google झाले आज २३वर्षाचे....

Image
    जगात भारी असं म्हंटलं कि अनेक गोष्टी समोर येतात.पण हि अशी गोष्ट आहे जी कमी वेळात अनेक ठिकाणी थेट पोहोचते आणि क्षणार्धारत तिचा उपयोग प्रत्येक मनुष्याला होतो आणि कायमस्वरूपी होत राहणार आहे.ती आहे google प्रख्यात कंपनी. हा google प्रत्येकाला हवा-हवासा आणि मोठ्यातील मोठी गोष्ट सहज उपलब्ध करून देणारा हा माझा जवळचा सखा म्हणजेच मित्र आहे.नवीन गोष्टी मला नेहमी आतुरतेने सांगणारा माझा (भावविश्वातला) (दोस्त) मला सगळं खरं-खुरं सांगून जातो ते हि अगदी माहितीपर मोठ्यासंख्येने आणि मी त्यात एवढी गुंग होते कि माझेच भान मला राहत नाही.नको त्या ( पानचट )गोष्टी पण google अगदी मजेशीर सांगतो.आणि शब्दांची खेळी तर google  इतक्या पटकन सांगतो कि (search) केलेले काही शब्द मी काही सेकेंदात अशी विसरते कि मी त्यात रमत बसली कि मला google चं पुन्हा मूळ विषयांवर आणून सोडतो.माझ्या सारखं सगळ्यांच होत असेल का ? आणि होत असेल तर तुम्ही काय बरं त्यावर search  करतात आणि नाही करत असाल तर करायला सुरुवात करा,कारण त्याला बरं वाटेल आणि तुमच्या डोक्याला चालना मिळेल आणि गमतीशीर किस्सा google   तुम्हा...