अबब्ब google झाले आज २३वर्षाचे....
जगात भारी असं म्हंटलं कि अनेक गोष्टी समोर येतात.पण हि अशी गोष्ट आहे जी कमी वेळात अनेक ठिकाणी थेट पोहोचते आणि क्षणार्धारत तिचा उपयोग प्रत्येक मनुष्याला होतो आणि कायमस्वरूपी होत राहणार आहे.ती आहे google प्रख्यात कंपनी. हा google प्रत्येकाला हवा-हवासा आणि मोठ्यातील मोठी गोष्ट सहज उपलब्ध करून देणारा हा माझा जवळचा सखा म्हणजेच मित्र आहे.नवीन गोष्टी मला नेहमी आतुरतेने सांगणारा माझा (भावविश्वातला) (दोस्त) मला सगळं खरं-खुरं सांगून जातो ते हि अगदी माहितीपर मोठ्यासंख्येने आणि मी त्यात एवढी गुंग होते कि माझेच भान मला राहत नाही.नको त्या (पानचट)गोष्टी पण google अगदी मजेशीर सांगतो.आणि शब्दांची खेळी तर google इतक्या पटकन सांगतो कि (search) केलेले काही शब्द मी काही सेकेंदात अशी विसरते कि मी त्यात रमत बसली कि मला google चं पुन्हा मूळ विषयांवर आणून सोडतो.माझ्या सारखं सगळ्यांच होत असेल का ? आणि होत असेल तर तुम्ही काय बरं त्यावर search करतात आणि नाही करत असाल तर करायला सुरुवात करा,कारण त्याला बरं वाटेल आणि तुमच्या डोक्याला चालना मिळेल आणि गमतीशीर किस्सा google तुम्हाला नक्की उपयोगी पडेल.(google) तर सगळंच कस झपकन सांगतो त्याचे (features) किती (interesting) आहेत तर मग आपण त्या संख्येने त्याची मज्जा घेवून किती (productive)काम करू शकतो ह्याच मापन कधी करू शकणार नाही.(google) जर आज नसतं तर काय झाले असते ह्याचा विचार सुद्धा आपण नाही करू शकत.
google चा प्रतिसाद नेहमी लक्षणीय ठरलेला आहे,संदेश प्रक्रिया सोपी झाली असून google सर्वोच पदी आपली भूमिका बजावतो.आज जगात जो कोणी इंटरनेटशी जोडला गेला आहे, त्या प्रत्येकालाच गूगल माहित आहे. गूगलने ज्या काही सेवा-सुविधा पुरवल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसे इंटरनेटशी जोडली गेली आहेत असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. गूगल ही लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भागच बनली आहे. गूगलचे ‘सर्च इंजिन’ हे जगात सर्वात प्रभावी मानले जाते. आपण गूगलच्या सर्च इंजिनचा वापर करून आपल्याला हवी असलेली कोणतीही माहिती क्षणार्धात मिळवू शकतो. अशा तऱ्हेने गूगलने माहितीचा खजिनाच लोकांना उपलब्ध करून दिला आहे. ज्या काळात मायक्रोसॉफ्ट, अँपल, IBM सारख्या बलाढ्य कंपन्या ‘सॉफ्टवेअर-हार्डवेअर तंत्रज्ञान’ क्षेत्रात जम बसवून होत्या, तेव्हा गूगल नवख्या असलेल्या ‘वर्ल्ड वाईड वेब’ प्रणालीचा उपयोग करून तंत्रज्ञान क्षेत्रात जम बसवू पाहत होती. गुगलने बुद्धिमत्ता, सर्जनशीलता यांची सांगड घालत लोकांच्या गरजांचा विचार करून अतिशय नाविन्यपूर्ण सेवा, उत्पादने जगात आणली आहेत. म्हणुनच एकेकाळी गॅरेजमधून सुरुवात केलेल्या या कंपनीचा सध्या जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळे गुगलची वाटचाल जाणून घेणे हे नक्कीच रोमांचकारक ठरेल.
Nice 🙂
ReplyDelete