Posts

Showing posts from June, 2024

पाऊस आणि गोधडी....

Image
पावसाची चाहूल लागताच सगळा आसमंत थोडा का होईना सुखावला आहे. प्रत्येक पावसाची प्रत्येकाची आठवण खूप वेग-वेगळी आहे. कोणाला पाऊस हवा-हवासा तर कोणाला नकोसा असा असतो. पण माझ्यासाठी पाऊस हा लहानपणापासूनच खूप आनंदाचा राहिला आहे. कारण याला आठवणींची जोड पण तशीच आहे. आजकालच्या लहान मुलांना गोधडी हा शब्द माहित नसेल पण ९०च्या दशकाच्या मुलांना हा शब्द नक्कीच माहित असेल. तसेच या गोधडीची उब आणि पाऊस हे कॉम्बिनेशन आजकालच्या बऱ्याच मुलांना माहीतही नाहीये.  अशातच बाहेर गारवा देणारा धो-धो पाऊस आणि घरात गोधडी घेऊन झोपण्याची मज्जा काय औरच असते. आणि ही मज्जा अनुभवताना बरेच किस्से देखील या निम्मिताने आठवतात. यातला एक किस्सा एक जुनी आठवण आज मी तुमच्या समोर मांडतेय.  गोधडी हा  शब्द जरी मला आता आठवला तरी डोळे पाणवतात आणि जुन्या आठवणींकडे कायम घेऊन जातात. आईची उबदार कुशी आणि आईच्या हाताने थंडी लागू नये म्हणून शिवलेली गोधडी अजूनही मनात घर करून कायम आहे. लहान असताना आईने पाळण्यात मावेल इतकी गोधडी तिच्या हाताने शिवली होती आणि आता मोठे झाले तरी आईने गोधडी बनवायचा तिचा छंद काही जून सोडला नाही....