महागाई उपासमारी बेरोजगारी ह्यांचे भोंगे वाजतायेत....
महागाई उपासमारी बेरोजगारी ह्यांचे भोंगे वाजतायेत.... जग हे दिल्या घेतल्याचं आणि जगातील मंडळी हि ऋणी आहेत सर्वांपरी. हे शाश्वत जरी खरं असलं तरी सर्वसमावेशक गोष्टीचा ह्याला काही फायदा होताना आपल्याला दिसत नाही.दिवसेंदिवस महागाई आरपार चाली असून सामान्य परिश्रम करणाऱ्या लोकांना ह्याचा उणीव फार बसत आहे. शेतकरी वर्गापासून ते नोकरदार वर्गाला प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तडजोड हि करावी लागत आहे,आणि ही तडजोड मोठ्याप्रमाणात करायला लागल्यामुळे पूवीपेक्षा आता पैसा खर्च करताना १० वेळा माणूस विचार करीत आहे. देशात घगूती गॅस सिलेंडरचे भाव ५० रुपयांनी वाढले आहेत.यामुळे आता ९९९.५० रुपयांवर सिलेंडर दर पोहचले आहेत. आजच्या पिढीला तरुण भारतीय आशावादी आणि आतमविश्वासाने परिपूर्ण आहेत.आपले आयुष्य कसे असावे,आपल्या आयुष्यात काय मिळवायचे आहे हे त्यांना आधीपासूनच माहित आहे,परंतु करोन काळापासून अनेक लोंकाच्या नोकऱ्या गेल्या असून कुटूंबाच्या गरजा आणि मागण्यादेखील वाढल्या आहेत त्यामुळे जबाबदाऱ्यांची पूर्तता करणे आणि त्यांना गरजेचा असलेला आरामदायीपणा पुरवणे महत्वाचे असते.तसेच आपले वाढते उत्पन्न आणि वाढती...