@Ambulanceचा #सायरन वाजतोय...🔊
मुबंई मायानगरी कधी न थांबलेली, कधीही शांत नसलेली आणि कधीही बंद न पडणारी,सुंदर स्वप्न दाखवणारी, सतत चंगळवादात नेहमी बुडालेली ह्या मुबंई मायनगरीला लागण झाली ती एका भयंकर (कोरोना)रोगांची.भयंकर विकृती दर्शवणारा तसेच भयावह परिस्थितीत आपल्याला भय दाखवून अशांतता पसरवणारा हा रोग पूर्ण देशभरात 2020 च्या फेब्रुवारी महिन्यापासून जो संसर्ग सुरू झाला तो अद्याप बंद तर झाला नाही पण,मनुष्ययोनीला हेलावून टाकणारी अनेक दृश्य,तसेच मोठ्याप्रमाणे वाढणारी रुग्ण संख्या रोजच्या रोज पाहायला मिळाली.
'नोवल कोरोना व्हायरस'(covid 19)हा अचंबित असा रोग देशभरात पसरला आणि..... काय झाले?अतिशय दाहक वातावरण त्यात शहरांतील जगजीवन खेळण्यातल्या पत्यांच्या बंगल्या सारखे कोलमडून ह्या रोगात सामील झाले.
जस-जसे हा विषारी वायू ह्या मानवी शरीरात मिसळल्याला सुरवात झाली तस-तशी दिवसेगणित संख्या वाढू लागली. ह्या सगळ्या हेलावून टाकणाऱ्या विस्कळीत आयुष्याला कलाम बसला.जगभरातील सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या,अत्या-व्यस्त व्यवहारात,रोजच्या दिनचर्येला आता कुठेतरी शिक्का बसला आणि ह्या परिस्थितीत मदतीचे दोन हात घेऊन हॉस्पिटल मधील डॉक्टर,नर्स त्यांचा सोबत पोलीस वर्ग मोठ्या जोखमीचे कार्य पार पाडत एकदम तैनातीने सढळ हाताने आपले कार्य सांभाळताना दिसले.ह्या परिस्थिती अनेक लोकांनी आपले प्राण गमावले अश्या ह्या अनेक कारणांमुळे विपरीत परिणाम देशावर दिसून आले.
मध्यंतरी हा कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अनेक देश आणि देशातील scientist दिवस-रात्र करताना पाहायला मिळाले.अनेक प्रकारच्या लसी उपलब्ध झाल्या लोकांना दिल्या गेल्या परंतु हे होत असतानाच ह्या रोगाची दुसरी लाट येत्या २०२१च्या फेब्रुवारी महिन्यात नव्याने वाढीस लागली आणि सर्वत्र एक खळबळजनक वातावरण दिसून आले पुन्हा सर्वसामान्य लोकांचे हाल,गरिबी, नोकरी धंदा बंद झाला अनेक लोकांनी स्थलांतर केले काही जणांनी आपला व्यवसाय सुरू केला पण ह्यामुळे परिस्तिती अजून खालावली प्रौढ व्यक्ती,सामान्य वर्ग,तरुण वर्ग, चालू शिक्षित विद्यार्थी ह्यांचे हाल झाले.सर्वात मोठे म्हणजे धकाधकीत लोकसंख्या,जिवलग परिवार, मित्रमंडळी ह्यांमध्ये दुःखत वातावरण निर्माण झाले आणि अश्या ह्या संसर्ग हवेत अनेकांनी आपला जीव गमावला. प्रसार माध्यमे,तोंडी सवांद सगळी कडे संख्याचा पाढा ऐक्याला मिळत होता.
हे सगळे चालू झाल्या पासून माझ्या वैयक्तीक जीवाला घोर लागला कि हे कधी, केव्हा आणि कसे स्थिरावले आणि मी नेहमीच्या आयुष्याचा आनंद मनमुरादपणे आनंद कधी घेईन..?पण.... ह्यांची कोणतीच शाश्वती मला देता येत नाहीये....
कारण,'अस्वस्थ आहे अजूनही मी कायमस्वरूपी....'
दिनांक:-०८/०४/२०२१ मी चर्चगेट स्थानकांवर ७.३०च्या दरम्यान येत होते त्या स्थानकावर पोचेपर्यंतचा पायी प्रवास मला खूप असाह्य अश्या वेदना देवून गेल्या म्हणजेच एकदम तिमिर शांतता दोन्ही रस्त्यावर मला खूप विचलीत करत होती कारण,माझा नेहमीचा रस्ता मला घरी जा..घरी जा.. घरी जा...असा आक्रोश करत होते पण माझे मन मोठ्याप्रमाणावर माझ्या मनाची घालमेल करीत होते कारण.....,ती एक 'रुग्णवाहिका'(Ambulance)लाल लाईट दाखवत #सायरन चा आवाज देत माझ्या बाजूने धावत होती आणि मनात भीती सोडून तीने अशांततेचा किडा माझ्या अंतरंगात भीतीचे जाळे करून माझ्या मनात बसली.मी चर्चगेट स्थानकावर पोहचले काही सेकंद थांबले आणि मग ट्रेन पकडली हा सगळा विचार मनातून काही केला तरी जात नव्हता म्हणून मी गाणी ऐकण्यासाठी #Headphone घालून बसले नेहमीप्रमाणे,ट्रेन वेळेनुसार सुटली पण काही मिनिटानंतर मला #सायरन चा आवाज पुन्हा ऐकू आला,मला वाटलं कि मला भास होतोय म्हणून मी #headphone काढले आणि ऐकते तर काय हा खरोखर #सायरन वाजत आहे,प्रत्येक काही स्थानका नंतर हा #सायरन माझ्या सोबती होता आणि मी कायमसाठी अस्वस्थ झाले.
कधी होणार हे शांत, कधी बंद होणार हा #नकोसा भीतीदायक आवाज आणि कधी येणार तो आनंदाचा दिवस माझ्या डोळ्यासमोर ह्या विचारत मी घरी पोहचले.
घरी परतल्यावर सुद्धा जोपेपर्यन्त हाच विचार अनेक गोष्टीला आठवत होता ते म्हणजे त्या रुगवाहिन्यातील व्यक्ती जिच्याशी माझा काहीच संबंध नाही परंतु तो #निष्पाप जीव कोणच्या आयुष्यातुन जाणार असेल तर ह्या पेक्षा मोठं दुःख मला कोणतं नाही बघायचं. तो व्यक्ती पुन्हा येईल का नक्की ह्या विचारांचे #चटके मला भासत होते,त्या रात्री मी देवाला एकच कळकळीची विनंती केली,
'हे देवा जिथे कुठे असशील तिथून ये आणि लोकांचे जीव वाचावं'कारण 'घराला घरपण देणारी माणसं' माझ्या सोबती नव्या आयुष्यात नसतील तर माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही हो...
एक विषाणू येतो आणि सगळी दुनिया उध्वस्त करतो असा शाप पुन्हा ह्यानंतर आयुष्यात कोणाच्या कधी ना येवो.असं देवाला सतत सातत्याने सांगत जाईन.
एक #सायरन एवढ्या मोठयाने वाजतो आणि रुग्णवाहिका एवढ्या #स्पीड ने धावते म्हणजे त्यात असलेला जीव किती त्या आजाराशी #झुंज देत असेल ह्याची कल्पना आपण कधी करू शकत नाही,आणि म्हणूनच थोडं मोठं मन करा कारण, "माणसांनी माणसाशी माणसासमवे वागणे"हे गाणं मला खूप काही #अस्वस्थ जीवाला सांगण्याचे प्रयत्न करीत होते.
#COVID-19
#COMMUNITY SAFE
#GLOBAL HEALTH
#CONTENT
#STAY HOME
#MONITORING SITUATION
#SOCAIL DISTANCING
#WASH YOUR HAND'S
#QUARANTINE AND CHILL
#LOCKDOWN
#CORONAVIRUS
#CORONAVIRUSPANDEMIC
#STAY SAFE
#SAVE LIVES
#SELF -ISOLATE
#EFFECTIVE WAYS
खरंच अतिशय दाहक आणि मनाला चटके देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. या विदारक परिस्थितीचं वर्णन उत्तम शब्दांत मांडलं आहेस तू नम्रता... खूप छान...👌👍
ReplyDelete